How to deal with the Life

How to deal with the Life      

        जगाव की मरावं हा एकच प्रश्न, किती सुंदर आणि किती अर्थ या वाक्याचे. मरण खुप सोपी आहे परंतू जगणं तेवढंच अवघड.

जीवनाच्या या अवघड वाटेवर कितीतरी दुःख भोगाव लागत, प्रत्येक दिवस हा एक नवीन संकट घेऊन उभा असतो आणि आपण कसा त्याचा सामना करतो हे बघत असतो यातून पुढे जाणं हा एकच पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतो, जीवनाला घाबरून दूर पळण यात कसलं धाडस आणि यातून आपण काय शिकलो? 

 खरंच किती स्वार्थी झालेत लोक आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा विचार न करता या संकटातून स्वतःला कस वाचवायचं ते शोधत असतात, जे लोक आपल्याला सुख मिळावं म्हणून आयुष्यभर झिजले त्यांचातरी विचार करावा, एक नवीन वाक्य एकण्यात आल की जन्म आणि मरण हे आपल्या हातात नसून हे जीवन कस जगावं हे आपल्या हातात आहे, पण ज्यांच्यामुळे आपण समर्थ झालो हे जीवन जगायला त्यांच्यासाठी जगणं काय चुकीचं आहे? आपले आई वडील ज्यांनी आपल्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या त्यांच्यासाठी आपण नाही जगू शकत, खरच किती स्वार्थी झालेत लोक जे स्वतःला होणारा त्रास सहन करु शकले नाही पण दुसऱ्यांना मात्र त्रास देऊन स्वतः कुठेतरी पळून गेलेत.

   कोणीही आपल्याला आयुष्यभर सोबत देऊ शकत नाही, आणि कोणामुळे कोणाचं काही अडत सुध्दा नाही, पण ज्यांनी स्वतःचा विचार न करता आपल्या सर्व गरजा पूर्ण केल्या त्यांचा अधिकार नाहिका आपल्या या जीवनावर? एका कारणासाठी लोक आयुष्य संपवायला तयार होतात पण जगण्यासाठी जे हजार कारण आपल्याकडे असतात त्यांचा विचार आपण का नाही करत. एवढं दुःख असते आपल्याला की दुसऱ्यांना आयुषयभरासाठी दुःख द्यायला आपण विचार करत नाही. का एवढं चुकीचं वागतो आपण? जीवनात सुखी कोणीही नाही पण आपल्यामुळे जर कोणी सुखी राहू शकले तर काय वाईट ?

अगदी लहान लहान मुलांना एवढं दुःख होत आहे की त्यांना जीवनाचं ओझ व्हायला लागलं, कधी आपल्या आई वडिलांचे कष्ट समजले असते तर कधीच कोणी अस वागल नसत. 

    आपल्याला हे जग दिसावं म्हणून आपली आई आपल्याला ९ महिने पोटात वागवते असंख्य वेदना सहन करून आपल्याला हे जग दाखवते, आपल्याला कुठलही दुःख होऊ नये म्हणून कितीतरी रात्र झोपत नाही आपली काळजी घेतात आणि मुलांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना हे दिवस दाखवायचे ??

    लहान मुलांना कुठून कळायला लागलं हे सर्व प्रेम आणि त्याकरता ते आपल्या जीवाची पर्वा करत नाही, हे सर्व चित्रपट आणि आपल्याला मिळालेल्या तंत्रज्ञानातून घडत आहे, नुकताच एका चित्रपटातील थोडा भाग बघितला की तो कलाकार आपल्या प्रेयसीसाठी आपला जीव द्यायला तयार असतो, किती दिवसाचं असते हे प्रेम? २, ४ वर्षांचं मग त्याच्यासाठी ज्यांनी आपले ३० वर्ष खर्च केले त्यांना जेव्हा आज तुमची गरज आहे तर स्वतःच्या सुखासाठी तुम्ही त्यांची स्वप्न आपल्या पायाखाली तुडवून जातात?? का हे असं वागणं, का आपण त्यांच्यासाठी नाही जगू शकत. ज्यांनी आपल्या सर्व स्वप्नांचा त्याग करुन आपल्याला जगात जगायला शिकवलं त्यांनी आपल्यासाठी जे स्वप्न पाहिले त्यांचा तो अधिकार आपण काढून घ्यायचा?? खरच किती स्वार्थी हे जीवन. आपला अधिकार आहे का आपल्या आयुष्यावर जेवढा आपल्या आई वडिलांचा आहे?? 

     किती वाईट आहे जे लोक स्वतःसाठी जगतात, आपला थोडासा त्याग जर त्यांना सुखी ठेवू शकतो तर काय चुकीचं करताय तुम्ही ? कधी कुठलाही चुकीचा विचार आपल्या मनात आला तर एकवेळा आपल्या आई वडिलांकडे बघा त्यांचा विचार करा? ज्या वयात त्यांना आनंद द्यायला हवा आपण त्यांना दुखवन हे कितपत योग्य आहे? आपण कदाचित कधीच आपल्या मुलांकरिता एवढा त्याग करु शकणार नाही आणि ते आपल्यासोबत जर असे वागलेत तेव्हा आपली अवस्था काय होईल?? 

 एकवेळा विचार करा जीवनात जर कोणाच्या उपयोगी पडलो तरच आपल्या जगण्याला अर्थ आहे स्वतःसाठी तर सर्वच जगले कधी दुसऱ्यांसाठी जगून बघा.

Women hiding her face

____________________________________________________________________________


English Translation


             The only question is whether to live or die, how beautiful and how meaningful this sentence is. Death is very easy but living is just as difficult.

         There is so much suffering on this difficult path of life, every day it stands with a new crisis and we see how we face it, the only option we have is to move on, what is the courage to run away from life in fear and what did we learn from it?

 How selfish people really are to find a way to save themselves from this crisis without thinking of others for their own selfishness, to think of the people who have spent their lives trying to make you happy It is in our hands, but what is wrong with living for those who have enabled us to live this life? You can't live for your parents who put their own needs aside for you, how selfish people have become who could not bear the suffering that happened to them but just ran away somewhere by hurting others.

   No one can support you for the rest of your life, and no one can stop you, but those who have fulfilled all your needs without thinking of themselves have no right to this life of yours? People are ready to end their lives for one reason but why don't we think of the thousand reasons we have to survive. We are so sad that we do not think of hurting others for the rest of our lives. Why do we behave so badly? No one is happy in life but what is wrong if we can make someone happy?

Even the youngest children are suffering so much that they have become a burden to live. Sometimes they would have understood the hardships of their parents, but no one would have ever behaved like that.

    Your mother treats you in the womb for 9 months to make you see this world. She shows you this world by enduring innumerable pains. She doesn't take many night's sleep so that you don't have any grief.

    It's all about the love that kids get to know and they don't care about their lives for it, it's all happening through movies and the technology we've got. 2, 4 years, then for those who have spent 30 years for him, when they need you today, you trample their dreams under your feet for your own happiness ?? Why behave like this, why you can't live for them. Do you want to take away the rights of those who gave up all their dreams and taught us to live in the world? How selfish this life really is. Do you have the same rights over your life as your parents?

     How bad are the people who live for themselves, if your little sacrifice can keep them happy, what do you do wrong? If you ever have a bad idea, look at your parents and think about them. At what age do you want to make them happy? You will probably never be able to sacrifice so much for your children and what will happen to them if they treat you like that ??

 Think once and for all, if you are useful to someone in life, then your life has meaning only for yourself, then all lives are for others.

Beautiful nature


Related Article
Previous
Next Post »