What is the problem?

What is the problem?

समस्या काय आहे ? का आपण नेहमी म्हणत असतो की मला ही समस्या आहे ? समस्या हा शब्द समजुन घेणं आधी महत्वाचं असते कारण आपण छोट्या छोट्या गोष्टींना समस्या समजत असतो आणि एखादी गोष्ट करायला नकार देत असतो.
     तर मग काय आहे समस्या ? समस्या अशी असते की आपल्याला जीवन जगताना क्षण क्षण हा खुप मोठा वाटायला लागतो, मी एक सुंदर आणि खुप विलक्षण अशी गोष्ट सांगतो जी मी ऐकली आणि खरच तेवढी समस्या जर असेल तर जीवन हे कस जगायचं हा एक प्रश्नच असेल, 
     एक नृत्य स्पर्धा असते ज्यामधे एक ८ वर्षाचा मुलगा येतो त्याच्या सोबत त्याचे शिक्षकही असतात आणि स्पर्धा सुरू होते मुलगा खुप सुंदर नृत्य करतो नंतर सर्व लोक त्याची प्रशंसा करतात तेव्हा त्याचे गुरु हे मंचावर येतात आणि सांगतात की हा मुलगा बोलूही शकत नाही आणि ऐकुपन शकत नाही तेव्हा सर्व लोक स्तब्द होऊन जातात कोणीही काहीच बोलत नाही सर्वांना वाटतं की खरच हा ऐकुपण शकत नाही आणि बोलुपन शकत नाही आणि एवढं सुंदर नृत्य करतो खरच खूप अशक्य गोष्ट होती पण त्या मुलाने एवढ्या लहान वयात करून दाखवली नंतर जे काही ज्येष्ठ असतात ते आपली मत व्यक्त करायला त्या मुलाच्या वडिलांना मंचकावर बोलवतात, वडिलांसोबत त्याची बहीण पण येते ती या मुलापेक्षा थोडी मोठी असते नंतर जे ज्येष्ठ असतात ते त्या मुलाची प्रशंसा करतात पण त्याचे वडील हे कुठलाही भाव व्यक्त करत नाही तेव्हा त्या मुलाचे गुरु सर्वांना सांगतात की त्याचे वडीलसुध्दा जन्मतः बोलू व ऐकू शकत नाही.  फक्त त्या मुलाची बहीण ही ऐकू शकते बोलू शकते ती चांगली असते, हे सगळ ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी येत, येवढ्यावरच त्याच दुःख संपत नाही तर अजून एक गोष्ट माहिती पडते की त्या मुलाची आई या जगात नाही........ अतिशय कठीण, अवघड समस्यांनी भरलेलं त्या ८ वर्षाच्या मुलाचे जीवन  ...... खरच एवढया समस्या आपल्या जीवनात आहेत का??? आपण का नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी तक्रार करत असतो? आपल्याला मिळालेले हे सुंदर शरीर हेच सर्वकाही आहे मग का आपण एखादी गोष्ट मिळवू शकत नाही? का आपल्याला अपयश येते? 
ही गोष्ट कल्पनिक नसून खरी आहे आणि माझ्या जीवनात जेव्हा एखादी अडचण येईल जेव्हा मला वाटेल की आपल्याकडे काही नाही तेव्हा नक्कीच ही गोष्ट मला आठवेल आणि मी कुठल्याही समस्या सोडवू शकेल..

Man in tension


______________________________________________

English Translation


What is the problem? Why do you always say I have this problem? It is important to understand the word problem first because we understand small things as problems and refuse to do something.
     So what's the problem? The problem is that every moment of your life you feel very big, I tell you a beautiful and very strange thing that I have heard and if there really is such a problem then how to live life will be a question,
     There is a dance competition in which an 8-year-old boy comes with his teachers and the competition starts. The boy dances very beautifully. Then when everyone praises him, his teacher comes on stage and says that this boy can't even speak and can't listen. People are stunned. No one is saying anything. Everyone thinks that he can't really hear and can't speak and he dances so beautifully. It was really impossible. But the boy did it at such a young age. The father is called to the stage, his sister comes with the father but she is a little older than the boy then the elders praise the boy but when his father does not express any emotion then the boy's guru tells everyone that even his father cannot speak and hear at birth. Only the sister of that child can hear and speak, she is good, hearing all this brings tears to everyone's eyes, the same grief does not end at this point, but one more thing is known that the mother of that child is not in this world ........ very difficult, The life of that 8-year-old boy full of difficult problems ...... Are there really so many problems in our life ??? Why do we always complain about everything? This beautiful body is everything we get, so why can't we get something? Why do we fail?
This story is not imaginary but real and when there is a problem in my life when I feel that you have nothing, I will definitely remember this story and I will be able to solve any problem.
alone women

Previous
Next Post »