Help Poors

Help Poors

आपण नेहमी बघत असतो समाजामध्ये राहणाऱ्या लोकांचे दोन वर्ग विभागले जातात त्यामध्ये एक वर्ग हा श्रीमंत लोकांचा असतो तर दुसरा हा गरीब लोकांचा. यामधील श्रीमंत वर्गातील लोक हे गरीब वर्गाला तुच्छ समजत असतात त्यांच्या बद्दल असणारे विचार हे नेहमी वाईट असतात. प्रत्येक श्रीमंत व्यक्ती खराब असतो असेही नाही परंतु हा भेदभाव बऱ्याचवेळा आपल्याला बघायला मिळत असतो. 
      आजच्या आधुनिक जगामध्ये सर्वांना सर्वप्रकारच्या सुखसुविधा ह्या हव्या असतात, पण त्या गरिबांना मिळत नाहीत आणि अत्यंत खराब परिस्थितीमध्ये ते आपल जीवन जगत असतात. बऱ्याचवेळा ते मदतीसाठी श्रीमंत लोकांकडे जात असतात परंतू बऱ्याचवेळा त्यांना मदत करायला कोणी पुढे येत नाही. 
      जगामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याकडे काही नसते आणि हे जग सोडतांना सुध्दा आपल्याला सगळ काही इथेच सोडून जावं लागते आपल्याकडे राहतात ते आपले कर्म आणि ह्याच चांगल्या कर्मामुळे लोक आपल्याला आठवण ठेवत असतात, आपल्याकडे जर सागराएवढं पाणी असेल तर त्यातील थोड पाणी जर एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला दिलं तर आपल्याला काही फरक पडणार नाही. 
     आपण एक रात्र अंधारात काढू शकत नाही तर गरिबांना कधी उजेड बघायला मिळत नाही, आपल्याकडे असणाऱ्या सुविधांची जाणीव ठेवा आणि दुसऱ्यांना मदत करायला कधी मागे हटू नका. कोणाची केलेली मदत ही कधीच वाया जाणार नाही.
Poor girl

_______________________________________________

English Translation


We always see that people living in a society are divided into two classes, one is rich and the other is poor. The people in the rich class despise the poor class and the thoughts about them are always bad. Not every rich person is bad, but we often see this discrimination.
      In today's modern world, everyone wants all kinds of comforts, but the poor do not get them and they live their lives in very bad conditions. Often they go to rich people for help but often no one comes forward to help them.
      When we come into the world we have nothing and even when we leave this world we have to leave everything here. We have our karma and people remember us because of this good karma. It doesn't matter to you.
     You can't spend a night in the dark, the poor never see the light, be aware of the facilities you have, and never shy away from helping others. No one's help will ever be wasted.
small poor boy

Previous
Next Post »