God is in man

    God is in man

                      बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की देव अस्तिवात आहे की नाही आणि आहे तर कुठे आहे ? खर तर याच उत्तर माझ्याकडेही नाही पण तरी मला जे वाटतं ते सांगतो. सर्वात आधी तर देव कुठे आहे? माझ्या मते देव हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे . आपण जर देवाची पुजा नाही केली तरी चालेल पण आपण केलेले चांगले कार्य हिच देवाची पूजा आहे. बरेच लोक हे देवाची पूजा करतात आणि त्यांचे कर्म हे चुकीचे असतात तर मग यातून मिळणार फळ हे नक्कीच वाईट असेल, कारण कुठलाही धर्म वाईट कर्म करण्याची शिकवण देत नसतो, नेहमी दुसऱ्यांची मदत करा, आपली वागणूक चांगली ठेवा म्हणजे आपल्यासोबत काही वाईट होणार नाही, प्रत्येक गोष्टीत देव आहे म्हणून आपल्या हातून काही चुकीचं घडता कामा नये.
 बरेच लोक म्हणतात की देव नाहीय? जर देव नाहीय तर मग जेव्हा सर्वकाही उपाय संपतात जिथे कोणीही मदत करू शकत नाही मग अशावेळेस आपण कोणाला मदत मागतो आणि का?
    तुम्ही देवाचं अस्तित्व नाकारु शकतात पण आपल्यामध्ये असणारा विश्वास तरी काय आहे? तुम्ही कुठल्या धर्माचे आहेत, कोणत्या देवाची पूजा करतात हे महत्वाचं नसून तुमचे कर्म किती चांगले आहेत. आपल्यामुळे कितीलोकांना मदत झाली हे महत्वाचं आहे. 
     आजच्या काळात आपण जात, धर्म या गोष्टींवर भांडत आहे, आपण माणूस आहे हे सर्व जन विसरत आहे. सर्वांसोबत
मिळून राहून जर आपण एखादी गोष्ट केली तर ती नक्कीच अप्रतिम असेल. का आपण सर्वांना समान समजत नाही. देव हा माणसात आहे म्हणून माणुसकी जपणे महत्वाचं आहे. 
    आपण आता बघत आहे की आपण सर्वकाही असतांनाही स्वतःला वाचवू शकत नाहीए, शरीर हे नश्वर आहे, एक दिवस प्रत्येकाला हे जग सोडवच लागेल, पण आपल्याला मिळालेला हा मानवाचा जन्म याचा जर आपण चांगला उपयोग नाही करु शकलो तर सर्वकाही व्यर्थ आहे. आपण केलेले चांगले कार्य नक्कीच कधीतरी आपल्या उपयोगी पडतील.
son helps father

______________________________________________


English Translation


             Many people question whether God exists or not, and if so, where is he? In fact, I don't have the same answer, but it does tell me what I think. First of all, where is God? I think God is in everything. If you don't worship God, it will work, but the good deed you have done is the worship of God. Many people worship God and if their deeds are wrong then the result will be bad, because no religion teaches to do bad deeds, always help others, keep your behavior good so that nothing bad will happen to you, in everything Since God exists, we must not do anything wrong.
 Many people say that there is no God? If there is no God, then when everything ends where no one can help, then who do we ask for help and why?
    You may deny the existence of God, but what faith do you have? It doesn't matter what religion you belong to or what god you worship, how good your deeds are. It is important that we help many people.
     Nowadays, we are arguing over caste, religion, all people are forgetting that we are human beings. With all
If we do something together, it will be amazing. Why don't we all understand the same? Since God is in man, it is important to take care of humanity.
    We see now that we cannot save ourselves in spite of everything, the body is mortal, one day everyone will have to save this world, but if we do not make good use of this human birth we have, then everything is in vain. The good work you have done will surely come in handy someday.
Daughter helps mother
Previous
Next Post »